शेतकर्‍यांना १२ हजार २६२ कोटींचा निधी वितरीत

19 Mar 2025 20:03:35
 mumbai
 
मुंबई | राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. या नुकसान भरपाईसाठी यंदाच्या वर्षी आतापर्यंत १२ हजार २६२ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच १३ हजार ३६१ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी मंगळवारी (१८ मार्च) विधानपरिषदेमध्ये दिली.
 
सदस्य परिणय फुके यांनी याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पाटील बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले की, राज्यात अनेक शेतकर्‍यांची बँक खाती ही आधार संलग्न नाहीत, तसेच ई-केवायसीही शिल्लक आहेत. यासर्व गोष्टी युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0