दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी उरण येथील यशश्री शिंदे हत्या प्रकरण....

By Raigad Times    01-Aug-2024
Total Views |
MUMBAI
उरण | उरण येथील यशश्री शिंदे या तरुणीच्या मारेकर्‍याला न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यशश्रीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दाऊद शेख याला ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी ( ३१ जुलै) सकाळी न्यायालयात हजर केले. दाऊदच्या अटकेनंतर अनेक नवीन खुलासे झाले आहेत. यशश्री शिंदे आणि तिची हत्या करणारा दाऊद शेख हे एकमेकांच्या संपर्कात होते.
 
 यशश्री शिंदे शाळेत असल्यापासून दाऊद शेख तिला ओळखत होता. यशश्री शिंदे लग्नाला नकार देत होती. लग्न करुन बंगळुरुला येण्यासही तिने नकार दिला होता. म्हणून दाऊदने तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दाऊदने यशश्री शिंदेला जेव्हा २५ जुलैच्या दिवशी भेटायला बोलवलं तेव्हा तो चाकू बरोबर घेऊनच आला होता. यावेळी दाऊद शेखने तिच्यावर धारदार शस्त्राने वार करुन तिची हत्या केली. २७ जुलै या दिवशी यशश्रीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला.
 
अत्यंत निर्घृण पद्धतीने तिची हत्या करण्यात आली. यशश्री शिंदेच्या अंगावर दोन टॅटू होते. त्यापैकी एकावर दाऊदचे नाव असल्याची बाब पोलीस रेकॉर्डवर आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दाऊद समोर यशश्रीच्या अंगावर हा टॅटू गोंदण्यात आला होता अशी माहिती पुढे आली आहे. मात्र यशश्रीने स्वखुशीने टॅटू गोंदवला होता की, दाऊदने जबरदस्तीने हा टॅटू गोंदवायला भाग पाडले होते? शिवाय दुसरा टॅटू कोणाचा? याचा तपास केला जात आहे. "दाऊद आणि मौसिन यांची मैत्री चांगलीहोती.
 
MUMBAI
 
लग्नाला नकार दिला म्हणून केली यशश्रीची हत्या; पोलिसांकडून माहिती
या दोघांचं भांडण झालं किंवा त्यांनी एकमेकांना ब्लॉक केलं तर दाऊद शेख मौसिनच्या फोनवरुन यशश्रीशी संपर्क करायचा. मात्र प्रेाचा त्रिकोण किंवा तसा काही अँगल समोर आलेला नाही. २०१९ मध्ये जेव्हा दाऊदला पॉक्सो अंतर्गत अटक झाली त्यानंतर काही कालावधीनंतर तो जामिनावर सुटला. त्यानंतर त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. अनेक दिवस तो यशश्रीच्या संपर्कात नव्हता.
 
मात्र काही महिन्यांनी मित्रांच्या माध्यमातून तो २०२० पासून तो पुन्हा यशश्रीच्या संपर्कात आला होता” असेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, २०१९ साली यशश्रीच्या कुटुंबियांनी पोस्को अंतर्गत दाऊद शेख वर गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी दाऊद शेखकोर्टात सुनावणीसाठी नेहमीच गैरहजर राहत असल्याने पनवेल न्यायालयाने अजामीन पात्र वॉरंट काढले होते. मात्र पोलिसांकडून दाऊदला अटक करण्यात दिरंगाई करण्यात आली आणि यात यशश्रीचा बळी गेला. जर पनवेल न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन नवी मुंबई पोलीसांनी ताबडतोब केले असते तर दुदैवी घटना टळली असती.