अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारे होणार चकाचक

जर्मन बनावटीच्या मशिन्स उपलब्ध आ.महेंद्र दळवी यांच्याहस्ते हस्तांतरण

By Raigad Times    01-Aug-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | अलिबाग तालुयातील समुद्रकिनारे आता चकाचक होणार आहेत. कारण महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने किनारे स्वच्छता करण्यासाठी जर्मन बनावटीच्या पाम टेक कंपनीच्या तीन अत्याधुनिक बीच लिनींग मशिन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्याहस्ते ग्रामपंचायतीना सुपूर्द करण्यात आल्या.
 
अलिबाग तालुक्यातील आक्षी, नागांव, रेवदंडा, वरसोली, थळ, नवेदर नवगाव, किहिम, आवास, सासवणे किनार्‍यावर या मशिन्स, ट्रटरच्या साह्याने समुद्रकिनारी वापरता येणार आहेत. किनार्‍यावरील रेती चाळून त्यातील कचरा जमा करण्याचे काम केले जाणार आहे. पोलीस मैदानावर वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे यांच्यासह सरपंच, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात कचरा पडल्याचे नेहमी दिसून येते. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळाने समुद्र किनार्‍यांच्या स्वच्छतेसाठी पुढाकारघेतला आहे.