उरण येथील घटनेच्या निषेधार्थ, पालीत बंद

By Raigad Times    01-Aug-2024
Total Views |
pali
 
सुधागड-पाली | उरण येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (ता.३१) पाली बाजारपेठ कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच संबंधित आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी या आशयाचे निवेदन पाली सुधागड तहसीलदार यांना देण्यात आले.
 
पालीतील बाजारपेठ बंद असल्यामुळे सर्वीकडे शुकशुकाट पाहायला मिळाला तसेच यावेळी तालुक्यातील इतर नागरिक देखील या ठिकाणी फारसे पाहायला मिळाले नाही. रहदारी देखील तुरळक होती. समस्त व्यापारी वर्गाने सर्व दुकाने बंद ठेऊन कडकडीत बंद पाळला. पाली सुधागड तहसीलदार उततम कुंभार यांना निवेदन देताना अनुपम कुलकर्णी, संजय म्हात्रे, श्रीकांत ठोंबरे, संदीप दपके, अलाप मेहता, नरेश खाडे, उततम ओसवाल व संजय ओसवाल आदी उपस्थित होते.