रायगड डाक विभागाची अनोखी जनजागृती मोहीम

By Raigad Times    01-Aug-2024
Total Views |
 post
 
अलिबाग | रायगड डाक विभागात एप्रिल पासून सुरू झालेल्या चालू आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेची १ हजार १२४ व १ हजार १०५ महिला सन्मान योजनेची खाती व जूनपासून लाडकी बहीण या योजनेंतर्गत ३ हजार ५०० बचत खाती उघडली गेली असल्याची माहिती रायगड डाक विभागाचे अधीक्षक सुनील थळकर यांनी दिली आहे.
येणारा श्रावण महिना आणि त्यात असलेला रक्षाबंधन हा सण याचे निमित्त साधत रायगड डाक विभागाने महिला व मुलींचा आर्थिक उत्कर्ष करणार्‍या डाक विभागाच्या योजना घराघरापर्यंत नेण्याच्या मानस थळकर यांनी व्यक्त केला आहे. आपल्या कर्मचारी वर्गाशी हितगुज करताना त्यांनी समाजिक ऋण फेडण्याची संधी डाक विभागात काम करताना आपल्या सर्वांना सहजगत्या प्राप्त झाली आहे. त्यामुळे ग्राहक धार्जिणे होऊन लाडकी बहीण व लाडकी लेक या योजनेसाठी लागणारे आधारलिंक बचत खाते, महिला सन्मान बचत पत्र, सुकन्या समृद्धी योजना या योजनाचा प्रसार प्रत्येक घरा घरापर्यंत पोहचवून खेडेगाव, शहरातील प्रत्येक बहिणीला खर्‍या अर्थाने रक्षाबंधनाचा आनंद देऊ या असे आहवान डाक कर्मचारी वर्गाला केले.
ग्रामीण जनतेपर्यंत ही महिती पोचवा पोस्टाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते काढणे अतिशय सोपे आहे त्यासाठी महिलाना केवळ त्याचे आधारकार्ड आणि त्यांचा मोबाईल नंबर असणे गजरजेचे आहे २०० रुपये शुल्क भरल्यानंतर संबधित महिलेचे खाते पोस्ट पेमेंट बँकेत उघडण्यात येते. पोस्ट पेमेंट बँक ही दूर्गम अशा ग्रामीण पातळीवरील घरापर्यंत उपलब्ध असल्याने महिला ग्राहकास अतिशय सोयीची आहे.