फडणवीस भुजबळांना बळ देतात हे आता जनतेच्या लक्षात आलं आहे. मराठ्यांचे 2-4 माकडं फडणवीस यांच्या बाजूने बोलतात. त्यामुळे समाजात नाराजी व्यक्त झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल साधला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, शांतता रॅलीचा आज चौथा दिवस आहे. आता तिसऱ्या जिल्ह्यात दौरा झाला आहे. राज्यातील मराठा आता मुलांना न्याय देण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आम्ही आमच्या मुलांच्या न्यायासाठी का रस्त्यावर येऊ नये? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे
भुजबळांना यासाठीच मंत्रिपद दिलं का?
मुठभर मराठा नेत्यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस संपूर्ण समाजाकडे दुर्लक्ष करत आहेत. पण जातीच्या लोकांनी त्यांना दाखवून दिले आहे, तुम्ही नेत्यांना मोठं करा समाज तुम्हाला योग्यवेळी उत्तर देईल. मी अजूनही सांगतो देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत, पण त्यांनी आमच्या हक्काचे आरक्षण द्यावे, असा निशाणा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला होता. यावर मनोज जरांगे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, मी त्यांना समजून सांगितले आहे. त्याचा अर्थ त्यांनी काय काढायचा तो काढावा. ते जनतेशी खुणशीने वागतात. हे त्यांच्या लक्षात आणून दिले आहे. त्यांच्यामुळे गरिबांचे वाटोळे होत आहे. हे त्यांच्या लक्षात आणून दिले आहे. त्यांना वाटते की, नेते जवळ आले म्हणजे जनता जवळ आली. आता त्यांनी भुजबळ यांना जवळ केलं आहे. फडणवीस भुजबळांना बळ देतात हे आता जनतेच्या लक्षात आलं आहे. फडणवीस यांनी भुजबळ यांना मंत्रीपद यासाठीच दिलं आहे का? मराठ्यांचे 2-4 माकड फडणवीस यांच्या बाजूने बोलतात. त्यामुळे समाजात नाराजी आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.