मुसळधार पावसामुळे अलिबाग ते रोहा मार्ग ठप्प!

By Raigad Times    08-Jul-2024
Total Views |
alibag
 
रायगड मध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे रायगडमधील विविध भागात पाणी साचलं आहे.अलिबाग ते रोहा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेल दिसून येत आहे.
 
जोरदार पावसामुळे अलिबाग ते रोहा रस्ते वाहतुक लोकल सेवेवर देखील मोठा परिणाम झाला आहे. रायगड मधील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. अलिबाग ते रोहा जाणाऱ्या लोकलसेवेवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतोय. त्यामुळे नोकरदारवर्गाने घराबाहेर पडण्याआधी या सर्व परिस्थितीचा आढावा घ्यावा.