मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात; एकाचा मृत्यू

By Raigad Times    06-Jul-2024
Total Views |
 MUMBAI
 
खोपोली । मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर तिन वाहनामध्ये झालेल्या विचित्र अपघात एकाचा मृत्यू झाला आहे. नवीन बोगद्यात हा अपघात झाला. ट्रेलरने पुढे धावणार्‍या गॅस टँकरला धडक दिल्यामुळे हा अपघात घडला.शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक ट्रेलर चालकाने गॅस टँकरला जोरदार धडक दिली.
 
त्यामुळे गॅसच्या टँकरने पुढे धावणार्‍या कारला धडक दिल्याने तीन वाहनाचा विचित्र अपघात झाला. यात चालक अक्षय वेंकटराव ढेले (वय 30 रा अहमदपूर कुमठा जी लातूर ) याचा टँकरच्या केबिनमध्ये अडकून जागीच मृत्यू झाला. अपघात केल्यानंतर कंटेनर चालक पळून गेला आहे.
 
या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस, बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, लोकमान्य रुग्णालयाची टीम, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल आदी टीम तात्काळ घटनास्थळी दाखल होत तिन्ही वाहनातील अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढून तिन्ही अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आली आहेत.