माझी लाडकी बहीण योजना : आता घरूनच करा ऑनलाइन अर्ज

By Raigad Times    06-Jul-2024
Total Views |
 MUMBA
 
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन हि योजना घोषित केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार सर्व महिलांना दरमहिने ₹1500 चा लाभ देणार असून या योजनेच्या माध्यमातून सरकार ३१ ऑगस्ट २०२४ सर्व लाभार्थी महिलांना लाभ देण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सर्व आवश्यक माझी लाडकी बहिन योजनेच्या कागदपत्रांबाबत महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
 
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अँप लिंक :
 
➡️अँप डाउनलोड केल्यानंतर अगोदर स्वतःचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे
➡️ अँप मध्ये नारीशक्तीचा प्रकार : जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर स्वतः करावा, किंवा अन्य पर्याय निवडावा
➡️अँप मध्ये गेल्यावर सर्वात खाली ४ मेनू दिसतील त्यापैकी पहिला मेनू नारीशक्ती दूत वर क्लीक करावे.
➡️ क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर क्लीक करा
➡️ फॉर्म उघडल्यानंतर संपूर्ण माहिती भरून घ्यावी
➡️ माहिती भरताना जन्माचे ठिकाण : ज्या ठिकाणी जन्म झाला ते ठिकाण, जिल्हा, गाव/शहर, ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका ही माहिती व्यवस्थित भरावी.
➡️ त्यानंतर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित माहिती भरावी.
➡️ सर्वात खाली कागदपत्रे अपलोड करताना -
आधार कार्ड मध्ये आधार कार्ड
अधिवास / जन्म प्रमाणपत्र मध्ये TC/जन्म प्रमाणपत्र (शासन निर्णयाच्या सुधारित आदेशानुसार कागदपत्रे)
➡️ उत्पन्न प्रमाणपत्र मध्ये उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड
➡️ हमीपत्र
➡️ बँक पासबुक
➡️ सध्याचा LIVE फोटो
या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करावी.
➡️ त्यानंतर खाली Accept करावे
➡️ माहिती जतन करा वर क्लिक करा
➡️ थोडा वेळ थांबा....तुम्ही टाकलेल्या मोबाईलवर OTP येईल
➡️ 4 अंकी OTP टाका
➡️ फॉर्म सबमिट करा.
आता तुमचा फॉर्म यशस्वीपणे सबमिट झालला असेल.
➡️ आपण भरलेल्या अर्जाची स्थिती जाणण्यासाठी केलेले अर्ज या टॅब वर क्लीक करा.
➡️ तुम्ही जो अर्ज केला आहे त्याची स्थिती तुम्हाला जाणता येईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज Scheme: pending मध्ये दिसेल.
 
तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःहून तुमचा फॉर्म भरू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना महाराष्ट्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला वरील सर्व कागदपत्रांची आवश्यकता असेल.