माझी लाडकी बहिण योजनेच्या विविध कागदपत्रांसाठी गर्दी

By Raigad Times    03-Jul-2024
Total Views |
 korlai
 
कोर्लई । महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभासाठी मुरुड तहसील कार्यालय व सेतू कार्यालय विविध कागदपत्र व ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत.
 
या योजनेअंतर्गत ज्यांचे उत्पन्न दोन लाख 50 हजार 500 पेक्षा कमी आहे. अशा महिलांना लाभ मिळणार आहे. यामध्ये एकूण एक कोटी महिलांना लाभ देण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे. या योजनेची माहिती महिलांमध्ये वार्‍यासारखी पसरली आहे.
 
या योजनेचे अंतिम तारीख 15 जुलै असल्याने सर्व सरकारी कार्यालयात ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती.