पेण | विधानसभा निवडणुकीपयरत राज्यात महायुती राहील, असे वाटत नाही, असे भाकीत शेकाप नेते जयंत पाटील यांनी केले आहे. सध्या जे महायुतीमध्ये चालले आहे, ते पाहता युतीचे कठीण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसर्या बाजूला महाविकास आघाडी कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
शेकापच्या पेण येथील नवीन कार्यालयाचे उद२घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, अतुल म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरै, शेकापचे पेण तालुका सरचिटणीस महादेव दिवेकर, जे.एम. म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया पाटील, पी.डी पाटील, महादेव दिवेकर, काशिनाथ पाटील आदीसह शेकापचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पेण तालुका असा आहे की नेते गेले तरी कार्यकर्ते ठाम राहतात. विधीमंडळात प्रश्न मांडत आसताना अतुल म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले आहे.
नवीन नागरिकरण होताना फायदे तोटे यांचा अभ्यास असणारे अतुल म्हात्रे आक्रमक नेते आहेत. या कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपण इंडिया आघाडीत आहोत, इंडिया आघाडीतच राहणार आहोत. आपण ज्या पारंपारिक जागा लढवल्या आहेत, विजयी झाले आहोत त्या जागा आपल्याला मिळाल्या पाहिजेत. तरुणांना संधी दिली जाईल. आम्ही शरद पवार यांच्या सोबत आहोत.
मात्र जे गेले ते फसले आहेत तुम्ही बघतच आहात असे सांगतानाच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केल.येथे येणार्या प्रकल्पांमधून शेतकरी बाहेर फेकला जातोय. शेतकर्यांना विश्वासात घेऊन विकास झाला पाहीजे. शेकापचे स्थान कमी झाली असा समज होता, परंतु अनेक कार्यकर्ते स्वत...हुन आलेत. कार्यकत्यारचा प्रतिसाद पाहता पेणचा पुढील आमदार शेकापक्षाचा असेल, असे अतुल म्हात्रे म्हणाले.
शेकापक्षाची पडझड झाल्यानंतर जयंत पाटील यांनी अतुल म्हात्रे यांच्यासारखा कार्यकर्ता दिला. नवीन कार्यालय सुरु केले आहे. पक्षाची चांगली घडी बसली आहे. जनसागराची दया आसणारे नेते जयंत पाटील आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत चांगली भरारी घ्यायची असून, शेकापक्षाचा पराभव कोणी करु शकत नाही, असे पेण तालुका चिटणीस महादेव दिवेकर म्हणाले.