सह. मॅनेजरकडून स्टेट बॅकेत दिड लाखाचा अपहार , नवीन पनवेल शाखेतील प्रकार; खांदेश्वर पोलीसात तक्रार

By Raigad Times    01-Jul-2024
Total Views |
 panvel 1
 
नवीन पनवेल । स्टेट बँकेच्या नवीन पनवेल शाखेत सह व्यवस्थापक म्हणून लोन विभागात कार्यरत असणार्‍या महिला कर्मचार्‍याने बँकेतच दीड लाख रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी पनवेल शाखा व्यवस्थापक एकता कडू यांनी खांदेश्वर पोलीस तक्रार केली आहे.
 
खारघर येथे राहणारी अलका अरुण राऊत हि महिला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये लोन डिपार्टमेंटमध्ये काम करत होती. त्यावेळी शाखेत फिलिप कुंवर आणि अलका राऊत यांच्या जॉईंट नावावर टर्म डिपॉझिट रक्कम तीन लाख 31 हजार 286 ही 12 महिन्यांच्या मुदतीसाठी ठेवली होत.
 
या टर्म डिपॉझिट रिसीटवर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा, बुधेल, गुजरात या बँकेकडून तीन लाख 21 हजारांचे डिमांड कर्ज घेतले आहे. टी डी आर वर डिमांड कर्ज घेतलेले असल्यामुळे पुन्हा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेकडून नव्याने कर्ज घेता येत नाही.
 
असे असताना अलका राऊत यांनी, नवीन पनवेल येथे डेप्युटी मॅनेजर या पदावर कार्यरत असताना पदाचा दुरुपयोग टर्म डिपॉझिट रिसीटच्या आधारे नवीन बोगस व खोटे डिमांड कर्ज खाते 2009 रोजी कम्प्युटर राईज सिस्टीममध्ये तयार केले आणि डिमांड करता बोगस कर्ज प्रकरण तयार केले.
 
सदरचे कर्ज प्रकरण हे संबंधित बँकेच्या अधिकारी यांच्याकडून मंजूर न करता व संक्शन लेटर आणि इतर कर्ज मंजुरीची कागदपत्रे न घेता सदरच्या कम्प्युटर राईज सिस्टीम मधील डिमांड कर्ज खात्यातून डिमांड कर्ज दीड लाख ही रक्कम त्याच वेळेस काढली आणि स्वतःच्या बँकेतील करंट अकाउंट मध्ये जमा करून घेऊन त्या रकमेचा अपहार केला. असे या तक्रारीत म्हटले आहे.