अलिबाग रेवस मार्गावर नांदाईपाडा फाट्यावर झाड कोसळून वाहतूक ठप्प

पडलेले झाड बाजूला करण्यात भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख दिलीप भोईर यांचा पुढाकार

By Raigad Times    01-Jul-2024
Total Views |
sogav
 
सोगाव | अलिबाग रेवस मार्गावर सोमवार दि.१जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास नांदाईपाडा फाट्यावर भररस्त्यात झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती.
 
यावेळी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख दिलीप( छोटम शेठ)भोईर यांनी आपल्या मित्रपरिवारांसह घटनास्थळी धाव घेऊन पडलेले झाड जेसीबी व इतर यंत्रणेच्या साहाय्याने बाजूला करत प्रवाशांना व वाहनचालकांना मोठा दिलासा दिला. यावेळी मांडवा पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस घटनास्थळी उपस्थित होते.
 
sogav
 
वाहतूक कोंडी झाल्यानंतर अनेक वाहनचालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारावर नाराजी व्यक्त केली, या मार्गावरील धोकादायक असलेली झाडे लवकरात लवकर काढून टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.