म्हसळा येथे गो हत्या प्रकरणी चारजणाविरांधात गुन्हा

By Raigad Times    01-Jul-2024
Total Views |
 crime
 
म्हसळा | म्हसळा तालुका वारळ गावातील चारजणांविरोधात गो हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात गो हत्या कायदा लागु असतानाही या कायद्याचा मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याने रायगड जिल्हयात अनेक ठिकणी अशा घटना घडत आहेत.
 
३० जुलै २०२४ रोजी म्हसळा तालुक्यातील मौजे वारळ येथील जुनेद दाऊद काझी, मुनाफ रहेमतुल्ला मुकादम, सकलेन मुस्ताक मुकादम, नवाज अहमद अब्दुल करीम काझी यांनी तांबड्या रंगाचे बैलाची कत्तल केल्याने त्यांना पोलीसांनी रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेनंतर म्हसळा सहा. पोलिस निरीक्षक संतोष आवटी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे.अधिक तपास पोलीस उप निरीक्षक डी.व्ही.एडवळे हे करित आहेत.
 
म्हसळा तालुयात गो धन चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. पोलीसांनी गो धन चोरी करणार्‍या व गो हत्या कायदा मोडणार्‍या आरोपींच्या मुसया आवलाव्यात अशी मागणी म्हसळा तालुयातील गो पालक आणि शेतकरी राजा सातत्याने करीत आहेत.