पेण | दादर येथून विवाहित महिला बेपत्ता; शोध सुरु

By Raigad Times    08-Jun-2024
Total Views |
 pen
 
पेण | पेण तालुयातील दादर गावातून ४० वर्षीय महिला बेपत्ता होण्याची घटना घडली आहे. सदर महिलाचा गावातील तरुणांनी व दादर सागरी पोलिसांना शोध सुरू केला आहे. सदर विवाहितेचे नाव सुनंदा जगदीश पेरवी वय ४० वर्षे, रंग सावळा, उंच-५ फुट अंदाजे अगांने मध्यम केस लांब, अंगात नेसुस वांगी जांभला रंगाची साडी व अंगात हीरवा रंगाचा ब्लाउज गळयात सोन्याची डवळी, हातात हीरव्या रंगाच्या बांगडया व गळयात पांढ-या रंगाची ओढणी कपाळयावर चंद्र कोर व डाव्या हाताचे अंगठयावर नाव गोदविणे परंतु ते खोडलेले, असे वर्णन आहे.
 
६ जून रोजी दुपारी पेण येथे सरकारी दवाखान्यात जाते असे सांगुन घरातुन निघुन गेली. माञ ती रात्री उशिरा पर्यंत घरी आलीच नसल्याने ती हरवली असल्याबाबतची फिर्याद त्यांचे पती जगदीश पेरवी यांनी दादर सागरी पोलीस ठाण्यात दिली आहे. सदर महिलेचा दादर गावातील तरुणांनी व दादर सागरी पोलिसांनी शोध सुरू केला असून पेण, अलिबाग, पनवेल येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. अधिक तपास प्रभारी अधिकारी नागेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.