खाजगी बसला अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

By Raigad Times    03-Jun-2024
Total Views |
 poladpur
 
पोलादपूर | पोलादपूर शहरातील प्रभातनगर येथे महामार्गावर आत्माराम ट्रॅव्हलला अपघात झाला. बस दुभाजकाला धडकल्यानंतर सुमारे १५० फूट दुभाजकाला घासत गेली. या अपघातात बसमधील २ चालकासह ४९ प्रवासी सुदैवाने बचावले आहेत.मुंबईमधून आत्माराम ट्रॅव्हलची बस तळ कोकणात जात असताना मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास बसला पोलादपूरजवळ अपघात झाला.
 
चालक जस्मीन सोहनी याचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकला धडकली व सुमारे १५० फूट घासत गेली. या बसमधून ४९ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने ते सर्व सुखरुप आहेत. दरम्यान, पोलादपूर शहरातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा पूर्व आणि पश्चिमेच्या सर्व्हिसरोडखालून जात असल्याने या हायवेवर दोन्ही सर्व्हिसरोडच्या संरक्षक कठड्यांजवळ स्ट्रीटलाईटची सुविधा ठेकेदार कंपनीने केली आहे. मात्र, ही स्ट्रीटलाईट गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने हायवे कुठे आहे,असा प्रश्न सर्व्हिसरोड व अंडरपास हायवेजवळून जाणार्‍या वाहनचालकांना पडतो आणि अपघात होतात.