बोरघाटात विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू, दोन जखमी

By Raigad Times    29-Jun-2024
Total Views |
 khopoli
 
खोपोली | मुबंई-पुणे एसप्रेस वेवर शुक्रवारी दुपारी तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात कार मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहेत, पुण्याहून मुबंईकडे कंटेनर माल घेऊन जातं असताना तो बोरघाटात, त्याला पाठीमागून येणार्‍या कार चालकाने जोरदार धडक दिली. यामुळे कंटेनरने त्याच्या पुढे धावर्‍या वाहनाला धडक दिली.
 
या अपघातात कार मधील ४ जणांपैकी २ जणांना गजागीच मृत्यू झाला तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत, या अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटलची टीम, अपघात ग्रस्त टीमचे सदस्य, खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, आदी तात्काळ घटनास्थळी दाखल होत कार मध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.