पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून 36 लाखांची फसवणूक , पोलादपूर येथून काकामहाराज भोंदूबाबाला बेड्या

By Raigad Times    29-Jun-2024
Total Views |
poladpur 
 
पोलादपूर । पैशांचा पाऊस आणि हवेतून गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून 36 लाखांची फसवणूक करणार्‍या भोंदूबाबा काकामहाराज उर्फ पंढरीनाथ गणपती पवार याला सातारा पोलिसांनी पोलादपूर तालुक्यातून मुसक्या आवळल्या आहेत. या भोंदूची पत्नी राजकीय पक्षाची पदाधिकारी असल्याचे समजते.
 
भोंदूबाबा काकामहाराज उर्फ पंढरीनाथ गणपती पवार याने सातारा जिल्ह्यातील एका तक्रारदाराला अघोरी पूजा, जादूटोणा, चमत्कार व टोटक्याच्या वस्तूंच्या विक्रीतून पैशाचा पाऊस आणि हवेतून गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून 36 लाखांना गंडा घातला.
 
याबाबत 25 जून 2024 रोजी सातारा पोलीस ठाण्यात एक तक्रार आली होती. त्या अनुषंगाने सातारा क्राईम बँचने रायगड जिल्ह्यातील काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. यांनरत सदर ढोंगी बाबाला पोलादपूर येथून ताब्यात घेतले. या कामात अन्य काही जणांची मदत घेतल्याचे त्याने कबूल केल्याची माहिती सहायक पोलीस निरिक्षक मते यांनी दिली.