लोकसभा अध्यक्ष- पदासाठी आज निवडणूक

By Raigad Times    26-Jun-2024
Total Views |
 new dehli
 
नवीदिल्ली । संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून अटीतटीचं राजकारण पाहण्यास मिळत आहे. एनडीएकडून ओम बिर्ला यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. तसेच इंडिया आघाडीकडून लोकसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस खासदार के.सुरेश यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
 
त्यामुळे आता लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी (26 जून) सकाळी 11 वाजता निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आता सर्व खासदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. काँग्रेसने व्हिप जारी करत बुधवारी सर्व खासदारांना संसदेत हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
तीन ओळीचा हा व्हिप असून काँग्रेसच्या सर्व खासदारांना बुधवारी सकाळी 11 वाजता सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ते संसदेचे कामकाज संपेपर्यंत सभागृहात हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.