पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृणपणे हत्या

दहिवली बौद्धवाडी येथील घटना.

By Raigad Times    24-Jun-2024
Total Views |
crime  
 
तळा | पितळे-तळा तालुक्यातील दाहिवली बौद्धवाडी येथे मालती सीताराम शिर्के वय ५०या नावाच्या महिलेचा चाकूने वार करून दगडाने ठेचून हत्या केली असल्याची दुर्दैवीघटना घडलीआहे.
 
पत्नीवर असलेल्या चारित्र्याच्या संशयावरून पती आरोपी याने हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तविला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.तळा पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सिताराम धोंडू शिर्के वय वर्षे ५५ रा.दहिवली बौद्धवाडी याने दि.२३.६.२४रोजी सायंकाळी४.३०च्या सुमारास दहिवली बौद्धवाडी गावाकडे जाणार्‍या रस्त्याच्या उजव्या बाजुला असणार्‍या कुंपणाजवळील जागेत चाकूने पोटावर सपासप वार करून नंतर दगडाने डोक्यावर ठेचून जिवे ठार मारले म्हणूनआरोपी सिताराम धोंडू शिर्के याला अटक करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा रजि. नं ५६/२०२४ भा.द.वि.स. कलम ३०२ प्रमाणे नोंद झाली असून याचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मा.सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गवई पुढील तपास करीत आहे.