७ जुलैपासून भाविकांना पांडुरंगाचे २४ तास दर्शन

By Raigad Times    24-Jun-2024
Total Views |
 vithal
 
मुंबई | पंढरपुरात आषाढ वारी नियोजनाची बैठक  पार पडली. या बैठकीत १७ जुलै रोजी आषाढवारी सोहळा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ७ जुलैपासून भाविकांना पांडुरंगाचे २४ तास दर्शन घेता येणार आहे. या बैठकीत मानाच्या दहा पालखी प्रमुकांच्या शासकीय पूजेत बसवण्याबाबत चर्चा झाली नाही.
 
त्यामुळे पालखी प्रमुखांना शासकीय महापूजेत बसवण्याची परवानगी मिळण्याची शयता कमीच आहे. आषाढी एकादशी शासकीय महापूजा करताना मुख्यमंत्री यांच्या सोबत मानाचा दहा पालखी प्रमुखांना पास देण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी संप्रदायाची बैठक घेतली होती त्यावेळी त्यांच्याकडे मानाच्या दहा पालखी प्रमुखांनी शासकीय महापूजा पास देण्याची मागणी केली होती.
 
यावरून मत मतांतरे सुरू झाली. मंदिर समितीची बैठक झाली या बैठकीनंतर सह अध्यक्ष औसेकर यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली. पास देण्याचा असा कोणताही निर्णय झाला नाही. याबाबत पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन मुख्यमंत्र्यांनी शासकीय महापूजा करते वेळी कोणी उपस्थित राहायचे याचा निर्णय घेतील असे स्पष्ट केले