दिघी कोळीवाडा हत्या प्रकरण; खुनीला जन्मठेप

By Raigad Times    22-Jun-2024
Total Views |
crime
 
श्रीवर्धन | दिघी येथे किरकोळ वादातून एकाची हत्या करणार्‍या खुनीला माणगांव सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ४ नोव्हेंबर २०२१ रोजी दिघी कोळीवाडा येथे होडीवर झालेल्या किरकोळ वादातून तुकाराम कमळाकर कावळे यांच्यावर त्यांचा सहकारी कृष्णा माया खेळोजी याने हल्ला केला.
 
या हल्ल्यात तुकाराम कावळे याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अति. सह जिल्हा व सत्र न्यायाधीश, माणगांव-रायगड यांच्यासमोर झाली. पुराव्याअंती कृष्णा खेळोजी याला माणगांव सत्र न्यायालयाने जन्मठेप व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.