छत्र्यांच्या नवीन ट्रेंडची बच्चेकंपनीला भुरळ,पावसाळी वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी

By Raigad Times    11-Jun-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाळ्यात आवश्यक साहित्याची जोरदार खरेदी सुरू झाली आहे. ताडपत्री, चपला, रेनकोट यांच्याबरोबरच छत्रयांनाही मोठी मागणी आहे.बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. नवीन आकर्षक छत्र्यांनी बच्चेकंपनीला वेड लावले आहे.मुंबईच्या घावूक बाजारातून छत्र्या किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
 
२०० रूपयांपासून ८०० रूपये किमतीच्या छत्र्यांची विक्री सुरू आहे. यंदा छत्रयांच्या किमतीत ५ ते ६ टक्के वाढ झाल्याचे पहायला मिळाले, मात्र बाजारातील स्पर्धेमुळे ग्राहकांना सवलत देण्यासाठी दुकानदारांमध्ये चढाओढ लागलेली पहायला मिळते.या हंगामात सर्वात महत्वाचे आणि हमखास गिरहाईक म्हणजे शालेय विद्यार्थी.
 
शाळेची पुस्तके , वहया , दफतर याबरोबरच छत्रयांची खरेदी सुरू झाली आहे. लहान मुलांसाठी कार्टून प्रिंटची छत्री आणि रेनकोट उपलब्ध झाले आहेत. या पावसाळ्यात लहान मुलांच्या रेनकोटमध्ये विविध कार्टून्सचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. यामध्ये डोरेमॉन, छोटा भीम, मोटू पतलू, स्पायडर मॅन, तर लहान मुलींसाठी डोरा, बार्बी डॉल, सिंड्रेला यांचे छायाचित्र असलेले रेनकोट बाजारात उपलब्ध झाले आहेत.
 
अशाच नवीन ट्रेंडच्या छत्रया रेनकोटसाठी लहान मुले पालकांकडे आग्रह धरीत आहेत.दरवर्षी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन ट्रेंडआणला जातो. यंदाही तसा प्रयत्न झाला आहे.बाजारात पारंपरिक छत्रीसोबतच रेनबो छत्री, थ्रीडी आणि रंग बदलणारी छत्री नव्याने दाखल झाल्या असून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
 
नवनव्या फॅशनच्या छत्र्या बाजारात दाखल झाल्या आहेत. बाजारात सध्या रेनकोट, छत्र्या, पावसाळी टोप्या, ताडपत्री, प्लास्टिक पेपर आणि अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.बाजारात विविध प्रकारच्या छत्र्या दाखल झाल्या आहेत. या छत्र्या २०० रुपयांपासून ते ८०० रुपयांपयरत मिळत आहेत. नामांकित कंपन्यांच्या चपला शूज यांच्याबरोबर अति शय स्वस्त दरातील प्लास्टीक आणि रबरच्या चपला बाजारात उपलब्ध आहेत.अगदी १०० रूपयांपासून १०० रूपयांपयरत त्यांच्या किमती आहेत. ग्राहक त्यांच्या आवाका आणि गरजेनुसार या वस्तूंना पसंती देत आहेत.
 
alibag
 
ताडपत्रीला मागणी
कोकणात अजूनही कौलांची घरे पहायला मिळतात.उन्हाळ्यात घरांची शाकारणी करण्यासाठी माणसे मिळत नसल्याने छपरांची दुरूस्ती करता येत नाही. त्यामुळे पावसाळ्यात छपराला गळती लागते अशावेळी गळती थांबवण्यासाठी छपरावर ताडपत्री टाकली जाते.सध्या बाजारात वेगवेगळया आकाराच्या आणि दर्जाच्या ताडपत्रया उपलब्ध आहेत.शेतीच्या कामातही ताडपत्रीचा
उपयोग केला जातो त्यामुळे त्यांचीही विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे.