सलमान खानसोबत लग्न करण्याचा तरुणीने धरला हटट! लग्न करण्यासाठी तरुणी पोहचली पनवेलच्या फार्म हाऊसवर

By Raigad Times    11-Jun-2024
Total Views |
 panvel
 
नवीन पनवेल | सलमान खानसोबत लग्न करण्याच्या हट्टापायी दिल्ली येथील एक तरुणी सलमान खानच्या पनवेलजवळील
फार्म हाऊसवर पोहोचली. सदर तरुणी मनोरुग्ण असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तिला एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे.दिल्ली येथील या पंचवीस वर्षीय तरुणीचे एका तरुणासोबत प्रेम संबंध होते.
 
त्या मुलाने लग्नासाठी नकार दिला. याचा तिला धक्का बसला. यापुर्वी ती तीन वेळा घराबाहेर पळून गेली होती. आता तिला सलमान खान सोबत लग्न करायचा आहे. यासाठी तिन पनवेल गाठले. सलमान खानसोबत लग्न करायचे आहे असा चंग बांधून पनवेल तालुयातील सलमान खानच्या फार्म हाऊसच्या दिशेने निघाली.
 
panvel
 
नेरे परिसरात आल्यानंतर तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी तिची चौकशी केली त्यानंतर तिने सलमान खान सोबत लग्न करायचे आहे असे सांगितले.ती मानसिक रुग्ण असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी काही काळाकरता तिला जवळच्या आश्रमात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर तिच्यावर सध्या एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचार सुरू आहेत.