उल्हास नदीमध्ये बुडून ११ वर्षीय बालकाचा मृत्य

By Raigad Times    11-Jun-2024
Total Views |
 karjat
 
कर्जत | तालुयातून वाहणार्‍या उल्हास नदीमध्ये शेलू येथे एक ११ वर्षीय मुलगा पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला आहे.याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात अनाथाश्रमाच्या चार कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
शेलू गावात असलेल्या एका अनाथाश्रममधील मुलांना घेऊन तेथील संस्थाचालक या उल्हास नदीवर गेल्या होत्या. सुनीता अशोक रामगिरी या त्या अनाथाश्रममध्ये मुलांना सांभाळत असतात.
 
९ जुन रोजी सायंकाळी त्या अनाथाश्रममधील मुलांना घेऊन उल्हास नदीमध्ये पोहण्यासाठी घेऊन गेले होते. यावेळी ११ वर्षीय दीपक गोपाळ सिंग हा बालक आपल्या मित्रांसह वाहत्या पाण्यात पोहत असताना अपघात घडला.