६.५० लाखांचे मेफेड्रोन जप्त; तरुण गजाआड

By Raigad Times    10-Jun-2024
Total Views |
 new mumbai
 
नवीन पनवेल | तळोजा फेज-१ मधील पेठाली गांव येथे एमडी नामक अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा लावून अटक केली. मोबिन मेहबुब खान (२८) असे या तरुणाचे नाव असून अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्याजवळ असलेले ६.५० लाख रुपये किंमतीचे ६५ ग्रॅम वजनाचे एमडी जप्त केले आहे.
 
तळोजा फेज-१ मधील पेठाली गांव येथे एक व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ
विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी आणि त्यांच्या पथकाने पेठाली गांव येथे सापळा लावला होता. यावेळी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणी मोबिन मेहबुब खान संशयास्पदरित्या आल्यानंतर अंमली पदाथ विरोधी पथकाने त्याची धरपकड केली.
 
त्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली असता,त्याच्याजवळ प्लास्टीकच्या पिशवीमध्ये पांढर्या रंगाचा पावडर सारखा एमडी (मेफेड्रोन) असा अंमली पदार्थ आढळून आला. त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोबिन खान याच्या जवळ सापडलेले अंमली पदार्थ जप्त केले.तसेच त्याच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.