महिलेला दारू पाजून बलात्कारप्रकरणी दोघांना दहा वर्षांची शिक्षा

By Raigad Times    09-May-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | महिलेला दारू पाजून तिच्यावर आळीपाळीने बालात्कार केल्याप्रकरणी दोघांना अलिबाग येथील सत्र न्यायाधीश ए.एस. राजंदेकर यांनी प्रत्येकी १० वर्षे कैद आणि १५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सुरेश लहानू नाईक व विशाल कृष्णा म्हात्रे अशी दोघांची नावे आहेत.
 
अलिबाग तालुयातील तळाशेत गावच्या हद्दीत वडवली रोडवर, नेटको कं पनीच्या टेकडीवर १९ डिसेंबर २०२० रोजी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. सुरेश नाईक व विशाल म्हात्रे यांनी पिडीत महिला ही तिच्या मुलीकडे तळाशेत वाडीवर गेली असता, ती एकटी असल्याचा फायदा घऊन तिला पाठीमागून पकडून झुडपात खेचत नेले.
 
तिला जबरदस्तीने दारु पाजून दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.या पीडित महिलेचे नातेवाईक तिचा शोध घेण्यास तळाशेत वाडीवर गेला असता तिचा आवाज ऐकून फिर्यादी हे त्या दिशेने गेले. त्यावेळी हे पिडीत