रायगड लोकसभा निवडणूक , मतदान झाले, आता लक्ष ४ जूनकडे

By Raigad Times    09-May-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | रायगड लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान घेण्यात आली. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या तारखेकडे लागले आहे. रायगडमध्ये सुनील तटकरे विरुध्द अनंत गीते अशी प्रमुख लढत आहे. या निवडणुकीसाठी मतदारसंघात ६०.५१ टक्के इतके मतदान झाले आहे.
 
रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण १६ लाख ६८ हजार ३७२ मतदार असून ८ लाख ४७ हजार ७६३ महिला तर ८ लाख २० हजार ६०५ पुरष आणि ४ तृतीयपंथीय मतदार आहेत. मतदान संपेपर्यंत एकूण १० लाख ९ हजार ५६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
 
असे एकूण ६०.५१ टक्के मतदान झाले आहे,यामध्ये पुरुष मतदार ५ लाख ३३४ तर महिला मतदार ५ लाख ९ हजार २३३ असल्याची मााहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.रायगड मतदारसंघात सर्वांधिक मतदान अलिबाग विधानसभा मतदारसंघात झाले आहे.
 
या क्षेत्रात ६६.६७ टक्के मतदान झाले आहे. त्या खालोखाल पेणमध्ये ६४.५० इतके मतदान झाले आहे. श्रीवर्धनमध्ये ५९. १९ टक्के, दापोलीमध्ये ५७. ३७ टक्के मतदान झाले आहे.सर्वाधिक कमी मतदान गुहागर मतदारसंघात झाले आहे. महाड विधानसभा मतदार संघामध्ये एकूण २ लाख ८४ हजार ३८६ मतदार असून त्यापैकी १ लाख ६३ हजार ६९६ मतदारांनी मतदान केले असून यामध्ये ८३ हजार ४१६ पुरुष तर ८० हजार २८० महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
 
दापोली विधानसभा मतदार संघामध्ये एकूण २ लाख ८० हजार २६१ मतदार असून त्यापैकी १ लाख ६० हजार ७९८ मतदारांनी मतदान केले असून यामध्ये ७५ हजार ८१० पुरुष तर ८४ हजार ९८८ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.गुहागर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण २ लाख ४० हजार ७५५ मतदार असून त्यापैकी १ लाख ३५ हजार ८७७ मतदारांनी मतदान केले असून यामध्ये ६२ हजार २५६ पुरुष तर ७३ हजार ६२१ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
 
रायगड लोकसभा मतदारसंघात कुठलाही अनूचित प्रकार न घडता शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली.मतदारसंघातील सर्व मतदार आणि मतदान प्रक्रियेतील सर्व,अधिकारी कर्मचारी यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आभार मानले आहेत.