विदेशी पाहुण्यांनी अनुभवली मतदान प्रक्रिया

By Raigad Times    08-May-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाहणीसाठी जिल्ह्यात आगमन झालेल्या विदेशी प्रतिनिधी मंडळातील सदस्यांनी पेण व अलिबाग तालुयातील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष जाऊन लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत निवडणूक मतदान प्रक्रिया जवळून अनुभवली.
 
मतदान प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी मतदान यंत्राची अंतिम पडताळणी करण्यासाठी होणारे ‘मॉक पोल’ पाहण्यासाठी सकाळी ५ वाजल्यापासून सर्व विदेशी प्रतिनिधींचा ताफा वेगवेगळ्या मतदान केंद्रावर पोहोचला होता. या मतदान प्रक्रियेच्या शुभारंभाची माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुकतेने भेट देऊन प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले.यावेळी ‘मॉक पोल’ ईव्हीएम मशीनची विेशासार्हता आणि पारदर्शकता ह्यासाठी ही अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगत प्रतिनिधींनी तशा नोंदी करून घेतल्या.