संजोग वाघेरे यांना खोपोलीतील एकता युनियन नाका कामगारांचा जाहीर पाठींबा

By Raigad Times    08-May-2024
Total Views |
 khopoli
 
खोपोली | मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील जमिनीवरील उमेदवार असल्याने दिवसेंदिवस अधिकच लोकप्रियता वाढू लागली आहे.विविध संघटनांचा पाठिंबा मिळत असताना खोपोलीतील एकता युनियन नाका कामगारांनी वाघेरे यांना जाहीर पाठिंबा इंडिया आघाडीच्या बैठकी दरम्यान दिला आहे.
 
इंडिया आघाडीची बैठक रविवारी, ५ मे रोजी लोहाना समाज हॉलच्या सभागृहात होती.यावेळी खोपोलीतील इंडिया आघाडीचे निवडणूक प्रमुख कैलास गायकवाड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास देशमुख, शेकापक्षाचे चिटणीस किशोर पाटील, खोपोली शहर चिटणीस अविनाश तावडे, शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष देशमुख,काँग्रेसचे शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन, आपचे जिल्हाध्यक्ष शेखर जांभळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अतुल पाटील, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष सुवर्णा मोरे, शिवसेना उपजिल्हा संघटिका अनिता पाटील, खोपोली शहर शिवसेनेच्या सुनंदा बने,काँग्रेसच्या शहराध्यक्ष रेखा जाधव, शेकाप शहर प्रभारी महिला चिटणीस ज्योसना रोकडे यांच्यासह प्रमुखांसह मोठ्या संख्येने इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
एकता युनियन नाका कामगार संघटनेचे अध्यक्ष एस.आर.गायकवाड,उपाध्यक्ष भिमराव यशवंत पवार, सेक्रेटरी संतोष कांबळे, खजिनदार मंगेश सकपाळ, मार्गदर्शक मनोज गायकवाड,संघटक गौतम मोरे, आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने नाका कामगारांनी इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थिती लावत संजोग वाघेरे यांना पाठिंबा दिल्याचे घोषित केले.
 
खा. श्रीरंग बारणे यांनी दहा वर्षात अनेकांनी पाहिलेच नाही तळागाळातील नागरिकांसाठी कोणतीही कामे न केल्याने खोपोलीतील नाका कामगारही बारणे यांच्यावर नाराज आहेत.म्हणूनच इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीत बारणेंचा पराभव निश्चित आहे. - मनोज गायकवाड, नाका कामगार प्रतिनिधी