खोपोली नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडला लागली आग; परिसरात धुराचे साम्राज्य

By Raigad Times    08-May-2024
Total Views |
 khopoli
 
खोपोली | मीळ गावाशेजारील डम्पिंग ग्राऊंडला सोमवारी, ६ मे रोजी रात्रीच्या दरम्यान आग लागून परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्याचे प्रयत्न केला. प्रशासनाकडून आग विझविण्यासाठी यंत्रणा उभी न केल्याने दुसर्‍या दिवशीही आग घुमसत होती.
 
टाटा कंपनीचे अग्निशमन दलाचे जवानांनी मदतकार्य केल्यानंतर आग आटोयात आली.मीळ डम्पिंग ग्राऊंडला रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याने, सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले आहे. या धुराने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यादरम्यान आरोग्य विभागाचे अतुल घोडके यांनी आपल्या आधिकारी कर्मचारी यांच्यासोबत पोहचून आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.
 
नगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले असून आग संपूर्ण डम्पिंगवर पसरली आहे. आगीच्या धुराने हजारो नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला.दुसरया दिवशी सकाळी टाटा कंपनीचे अग्निशमन दलाचे जवान,अपघातग्रस्त टिमने मदतकार्य केले.दरम्यान, अग्निशमन दलाचे चार पेक्षा जास्त बंब आग विझवत आहेत. आरोग्य विभागाचे अधिकारी रात्रीपासून आग विझविण्याचे पराकाष्ठा करीत असल्याची माहिती मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी दिली आहे.