कर्जतच्या युवकाचा पुण्यात अपघाती मृत्यू

By Raigad Times    08-May-2024
Total Views |
 karjat
 
कर्जत | कर्जत तालुयातील शिंगढोळ येथील सूरज नारायण भालिवडे (३४) हा युवक दुचाकीवरूनजात असता मागून येणार्‍या टँकरने धडक दिली व सुमारे पंचवीस फूट फरफटत नेले. या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पुणे येथील सुसगावमधील शिवबा चौकात घडली.याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या घटनेने कर्जत तालुयातील कशेळे परिसरात शोककळा पसरली आहे. सूरज सकाळी कर्जतहून आपल्या दुचाकीने पुणे येथे नोकरीनिमित्त जात असता दुपारी साडे अकराच्या सुमारास सुसगाव मधील शिवबा चौकात मागून येणार्‍या टँकरने जोरदार धडक दिली आणि दुचाकीस सूरजला पंचवीस फूट फरफटत नेले.त्यातच सूरजच्या पोटावरून टँकरचे पुढील डावे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
 
त्यानंतर टँकर चालकाने पुढे रिक्षालाही धडक दिली त्यात रिक्षा चालक मनोज राठोड किरकोळ जखमी झाला. सूरज नोकरी निमित्त त्याच्य कुटुंबीयांसोबत मुळशी तालुयातील सुसगाव येथे वास्तव्यास होता. सूरज रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य रेश्मा सोपान भालिवडे यांचा पुतण्या होता.
 
याप्रकरणी समृद्ध संजय कानेकर रा. सुसगाव यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी नागनाथ विलास अर्जुन या टँकर चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. सूरजच्या पश्चात आई, वडील, पत्नी,दहा महिन्याचे लहान बाळ असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने भालिवडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.