रायगड लोकसभेसाठी ६० टक्के मतदान;मतदारांमध्ये निरुत्साह...मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता

By Raigad Times    08-May-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | रायगड लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे ६० टक्के इतके मतदान झाले. मतदान करण्यासाठी काही मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे चित्र दिसले. मात्र मतदारांमध्ये फारसा उत्साह नव्हता. अतिशय धिम्यागतीने मतदान करण्यासाठी मतदार येत होते.
दोन तालुक्यांतील काही मतदारांनी बहिष्कारदेखील टाकला होता.
 
अंतिम अधिकृत आकडेवारी हाती आली नसली तरी, मतदानाचा टक्का आणखी फार वाढेल असे दिसत नाही.रायगड लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (७ मे) मतदान झाले.१६ लाख मतदारांपैकी सुमारे ६० टक्केच मतदान झाले. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. ९ वाजेपर्यंत अवघे ९.५ इतके मतदान झाले तर अकरा वाजेपर्यंत २५.५ टक्के मतदान झाले.
 
alibag
 
सध्या उन्हाचे दिवस असल्यामुळे सकाळच्या सत्रात मोठ्याप्रमाणात मतदान होऊन मतदानाची टक्केवारी साधारण ३५ टक्केवारीपर्यंत जाईल, असा अंदाज होता. मात्र ३९ टक्के मतदान होण्यासाठी दुपारचा एक वाजला.दुपारी एक ते तीन या तीन तासांत अवघे पाच टक्के मतदान झाले.
 
पुढील दोन तासांत म्हणजेच संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५३.७७ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मतदान करण्याची वेळ संध्याकाळी सहा वाजेपर्यंत होती.त्यामुळे शेवटच्या तासांत साधारण ६० टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज आहे. मात्र अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नाही.

alibag
 
५ वाजेपर्यंतचे मतदान विधानसभानिहाय
पेण           ५१.००
अलिबाग  ५२.२३
श्रीवर्धन    ४९.४८
महाड      ४५.०६
दापोली    ५०.१२
गुहागर    ५३.७७