शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्यावर हल्ला!

By Raigad Times    04-May-2024
Total Views |
 mangoan
 
माणगाव | शिवसेनेचे (ठाकरे) जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर टेमपाले ते वीरदरम्यान त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची. महाडचे आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी हा हल्ला केल्याचा आरोप नवगणे यांनी केला आहे.
 
गुरुवारी संध्याकाळी सात वाजता सुष्मा अंधारेंची जाहीर प्रचारसभा महाडमध्ये होती. सभा संपली आणि एका लग्नाला उपस्थिती नवगणे हायवेने माणगावकडे येत होतो. वीर जवळ आले असता, समोरुन बाटलीचा हल्ला ड्रायव्हरच्या बाजूने काचेवर करण्यात झाला. तर दुसर्‍या बाजूने २५-३० जणांनी हल्ला केला. यामध्ये आमदार भरत गोगवले यांचे पुत्र विकास गोगावले हे देखील असल्याची माहिती नवगणे यांनी दिली.
 
नवगणे म्हणतात, विकास गोगावले आणि त्यांची लोेेकं मला जिवे मारण्यासाठी तिथे आले होते. चालकाने परिस्थितीचं भान राखून कार वेगाने जमावामधून बाहेर काढली. मात्र २५-३० लोकांनी माझ्या गाडीवर हल्ला केला. माझी गाडी पूर्णपणे फोडली. माझे चालक आणि सोनावणे नावाचे सहकारी माझ्याबरोबर होते. मी माणगाव येथे आल्यानंतर तेथील पोलीस निरिक्षकाना सर्व हकिकत सांगितली असल्याचे ते म्हणाले.
 
दक्षिण रायगडचा जिल्हाप्रमुख मी माझे विचार प्रकटपणे व्यक्त करतो. आज मी महाडमध्ये भाषण केले. अशा भाषणांमधील वक्तव्यांचा राग मनात धरुन तुम्ही हल्ले करत असाल तर आमदार आणि त्यांच्या पुत्राने बांगड्या भरुनच घरात बसावे असा टोला नवगणे यांनी लगावला आहे.
 
मी कधीच घाबरणार नाही. मी बाळासाहेबांचे विचार आणि उद्धव ठाकरेंचे विचार आम्ही बाहेर घेऊन फिरतोय. त्यांना पराभव समोर दिसत आहे. त्या नैराश्येमधूनच माझ्यावर हल्ले करत आहेत. हल्ले करतं कोण? डोयामध्ये कायम याला मारु, त्याला मारु असे विचार असतात तेच करतात. त्यांना सत्तेत असल्याने थोडा माज चढला आहे. असे १०० हल्ले केले तरी आम्ही घाबरणार नाही. वस्तूस्थिती कायम मांडत राहणार, असंगी नवगणे यांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी मी महाड तालुयातील इतर ठिकाणी सभेमध्ये होतो असा दावा विकास गोगावले यांनी केला आहे. पुराव्यादाखल त्यावेळचा एक फोटो देखील त्यांनी पत्रकारांना दाखविला. हवे तर माझी नार्को टेस्ट करा असे जाहीरपणे त्यांनी सांगितले आहे.