महाराष्ट्रातून उद्योग धंदे पळवले...मंत्रायलसुद्धा गुजरातला पळवतील ; आदित्य ठाकरे यांची भाजपवर तोफ

By Raigad Times    04-May-2024
Total Views |
 Murud
 
कोर्लई / मुरुड | आज उद्योग धंदे गुजरातला पळवत आहेत, उद्या महाराष्ट्राचे मंत्रायल सुद्धा पळवायला मागे पुढे पाहणार नाही अशी तोफ शिवसेना युवा नेते (ठाकरे गट) अदित्य ठाकरे भाजपवर डागली. महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा घास घेऊन गुजरातला देणार असतील तर मी आडवा येणारच असही त्यांनी यावेळी ठणकावले आहे.
 
रायगड लोकसभा इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीतेंच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मुरुड येथे आले होते. यावेळी, भाजपा दावा करतो आहे अबकी बार चारसो पार पण हे आणनार कुठून अमेरिकेहून की चंद्रावरून असा टोला अदित्य यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रावर चाललेल्या छळ, अन्याय रोखायला पुन्हा एकदा लढाईत आलो आहोत.
 
देश विरुद्ध भाजप, लोकशाही विरुद्ध भाजप, संविधान विरुद्ध भाजप अशी सुरू आहे. आता तुम्हाला ठरवायचे आहे की कोणा बरोबर जायचे. भाजप दोन धर्मात वाद निर्माण करत आहे.दहा वर्षांत यांना महीला दिसले नाहीत, शेतकरी दिसले नाहीत, युवा दिसले नाहीत, गरीब दिसले नाहीत आता यांना या चार जाती दिसत आहेत.
 
या शेतकर्‍यांना दिलेले एकही वचन या सरकारने पुर्ण केलेले नाही. हे युवा शिकलेले आहेत पण महाराष्ट्रात जॉब नसल्याने ते मिळत नाही कारण सर्वच उद्योग गुजरातला जात असल्याचे अदित्य यांनी म्हटले आहे.महीलांवर बलात्कार करणार्‍यांना वाचवणारे, भ्रष्टाचार करणार्‍यांना मांडीवर घेऊन बसणार्‍या भाजपा सोबत जाणार का? असा सवाल आदित्य ठाकरेनी मतदारांना केला आहे.
 
महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा घास घेऊन गुजरातला देणार असतील तर मी या विरोधात आठवा उभा राहणारच असे आदित्य ठाकरेनी ठणकावून सांगितले.हे भाजपा सरकार, महागाई तर कमी होतच नाही पेट्रोल, डिझेल, गॅस ने महागाईचा पंचांग गाठला आहे या मध्ये गरीब भरडला जात आहे.
 
तरी या भाजपला धडा शिकविण्यासाठी इंडिया आघाडीला निवडून द्या मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून अनंत गीतेंना बहुमतांनी निवडून द्या असे आवाहन आदित्य ठाकरेनी केले आहे.या प्रचारसभेसाठी फकीर महंमद ठाकूर, शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शेख सुभान अली, भाई जगताप, पंडीत पाटील यांनी अनंत गीतेंना बहुमतांनी विजयी करा असे आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी सुरेंद्र म्हात्रे, प्रशांत मिसाळ, नौशाद दळवी, आदेश दांडेकर, प्रमोद भायदे, कृणाल सतविडकर, प्रशांत कासेकर, विजय गिदी, वामन चुनेकर, मुग्धा जोशी, असलम हलडे यांसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.