पोलादपूर एस.टी.स्थानकामध्ये वृध्देच्या हातातील 3 तोळयाच्या बांगडया लंपास

By Raigad Times    04-May-2024
Total Views |
 poladpur
 
पोलादपूर |  तालुक्यातील महालगूर येथील एका वृध्देच्या हातातील 2 सोन्याच्या बांगडया अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना पोलादपूर एस.टी.स्थानकामध्ये घडली असून याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
2 मे 2024 रोजी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास सुलोचना सिताराम घाडगे (वय 68 रा.महालगूर, ता.पोलादपूर) यांच्या हातातील दोन वापरत्या तीन तोळयाच्या बांगडया त्या एस.टी.बसमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या वृध्दापकाळाचा गैरफायदा घेऊन हातातून ओढून लंपास केल्या.
 
तीन तोळे वजनाच्या फुलांची डिझाईन असलेल्या या जुन्या वापरत्या बांगडयांची किंमत पोलीस तक्रारीत 45 हजार रूपये नोंद करण्यात आली असून सध्याच्या बाजारभावानुसार 2.75 लाख रूपये किंमत होत आहे.याप्रकरणी पोलीस हवालदार बामणे हे पोलीस निरिक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. पोलादपूर पोलीस ठाण्यात 54-2024 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.