अजंठा लॉन्चचे चेअरमन मामु मुल्ला यांचे निधन

By Raigad Times    04-May-2024
Total Views |
 alibag
 
सोगाव | अजंठा बोट(लॉन्च)जलवाहतूक सहकारी संस्था सर्व्हिसचे चेअरमन मामु मुल्ला यांचे गुरुवार (२ मे रोजी) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव मुळगाव कोकणातील मंडणगड असल्याने त्यांची अंतिम दफनविधी शुक्रवारी गावीच करण्यात आले मुंबई गेटवे येथून प्रवाशांना जलवाहतूक मार्गे बोटीने एलिफंटा व मांडवा याठिकाणी जाण्या-येण्यासाठी जलवाहतुकदारांची सहकारी संस्था स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
 
मामु मुल्ला हे दिलदार व मोठ्या मनाचे व्यक्तिमत्त्व होते. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी संस्थेच्या सर्व सभासदांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला होता. मुंबईतील डोंगरी भागात त्यांचे वास्तव्य होते. मात्र मुळ गाव मंडणगडशी त्यांनी नाते कायम जोपासले होते. अजंठा बोटीच्या प्रवाशी, दिव्यांग, आजारी रुग्णांना प्रवासात सवलत उपलब्ध करून दिली होती.