खारघर येथे हॉस्पिटलमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण

By Raigad Times    04-May-2024
Total Views |
kharghar
 
पनवेल | पार्टनरशिपच्या वादातून हॉस्पिटलमध्ये घुसून डॉटरला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना खारघरमध्ये घडली आहे. यासंदर्भात मॅट्रिकस सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ. नंदगोपाळ आचारी यांच्या तक्रारीवरुन तीन जणांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
डॉटर नंदगोपाळ आचारी हे मॅट्रिकस सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल नावाने सेटर पाच-खारघर येथे पार्टनरशिपमध्ये हॉस्पिटल चालवितात. हॉस्पिटलमध्ये पाचजण पार्टनर आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये पाच पार्टनरमध्ये हॉस्पिटलच्या आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाला. त्यावेळी खारघर पोलीस ठाण्यात आचारी यांनी तक्रार अर्ज दिला.
 
१ मे रोजी डॉ. नंदगोपाळ आचारी आणि त्यांची पत्नी हॉस्पिटलमध्ये असताना, दुपारी जयंतीलाल मसुरीया व पार्टनर राहुल गणेश मेहता यांचा चालक निखिल देशमुख हे दोघे एका महिला बाऊन्सरसह हॉस्पिटलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी आचारी यांची पत्नी आणि तीन महिला स्टाफ यांनी त्यांना अडविले.
 
त्यावेळी त्यांच्यात शाब्दीक वाद झाल्याने, पोलिसांना फोन करुन, बोलावण्यात आले. पोलीस आल्यानंतर, ते दोघेही तेथून निघून गेले. दुपारी सव्वातीनच्या सुमारास जयंतीलाल मसुरीया, राहुल मेहता बाऊन्सर हे अचानक हॉस्पिटलमध्ये घुसले आणि डॉटर आचारी यांना शिवीगाळ करुन मारहाण केली.