पनवेल शहरात भिंत कोसळून कामगाराचा मृत्यू; १ जखमी,फडके नाट्यगृहासमोर वाहनतळाचे काम सुरु असताना दुर्घटना

By Raigad Times    03-May-2024
Total Views |
 alibag
 
नवीन पनवेल | पनवेल शहरातील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह समोर वाहनतळाचे काम सुरु असून, याठिकाणी गुरुवारी      (२ मे) भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला. तर एक कामगार जखमी झाला आहे.पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासमोरील सरस्वती विद्यामंदिर शाळा पाडून त्या ठिकाणी वाहनतळाचे काम सुरु आहे.शहरातील फडके नाट्यगृहासमोर वाहनतळाचे काम सुरु आहे.
 
या ठिकाणी वाहनतळासाठी भिंत बांधण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या वाहनतळासाठी नव्याने भिंत बांधण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी याठिकाणी दोन कामगार माती काढण्याचे काम करत होते. यावेळी अचानक त्यांच्या अंगावर वाहनतळाची भिंत कोसळली.
 
यात दोन्ही कामगार जखमी झाले.जेसीबीच्या सहाय्याने या दोघांनाही बाहेर काढण्यात आले आणि तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र गंभीर जखमी झालेल्या नर्सेद चुरु शेख (वय ५६, रा. पनवेल) या कामगाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. तर दुसर्‍या कामगाराला किरकोळ दुखापत झाल्याने, त्याच्यावर उपचार करुन त्याला सोडून देण्यात आले.या दुर्घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास सुरुआहेत. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.