तळातील गो.म.वेदक शाळेचा ९७.४३ टक्के निकाल

By Raigad Times    28-May-2024
Total Views |
 tala
 
तळा | माध्यमिक शालांत परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला असून तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गो.म वेदक विद्या मंदीरचा ९७.४३% निकाल लागला असून समृध्दी साळुंखे ८८.६०% प्रथम, सिमरन पवार ८७.८०% द्वितीय, गौरी कांबळेकर ८२.४०% तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.प्र.म.जोशी प्रशाला पन्हेळी ८८.८८% निकाल लागला असून प्रथम- आर्यन मोडके ८३.२०% द्वितीय-दर्शना निलेशमनवल ७२.८०% तृतीय - भुमिका अशोक मोडके ७१.६०% क्रमाकांने उत्तीर्ण झाले आहेत.
 
यावेळी मात्र मुलांनी बाजी मारली.एस एस निकम इंग्लीश स्कुलचे १६ पैकी १६ निकाल १००% लागला असून पार्थ मनोहर पाटील ९२%, भुमिका प्रकाश चौधरी ९२% प्रथम, शर्वरी शिंदे ८८.६०% द्वितीय, संबोधी उत्तम जाधव ८८% तृतीय, मोहित कांदळकर ८६.४०% चतुर्थ समृध्दी बांगर ८६.२०% पाचवी, तळा हायस्कुला ७८ विद्यार्थी बसले होते पैकी ७६ उत्तीर्ण झाले.
 
तालुयात ११ हायस्कूल मधून एकूण २९३ बसले पैकी २७९ उत्तीर्ण झाले आहेत. तालुयाचा निकाल ९५.५४% लागला आहे. तालुयातील आदर्श माध्यमिक विद्यालयमांदाड ९ पैकी ८ , निकाल ८८.८८% वरदायनी विद्यालयमहागांव १० पैकी१०, निकाल १००% अशोक लोखंडे हायस्कूल पिटसई ४१ पैकी ३९, निकाल ९५.१२% कुणबी समाज विद्यालय म्हसाडी ९ पैकी ९ निकाल १००% माध्य विद्यालय पढवण १५ पैकी १३ निकाल ८६.६६% अभिनव ज्ञान मंदिर उसर, २२ पैकी २२ निकाल १००% बंदरकाठा माध्यमिक विद्यालय मजगांव ४० पैकी ३९निकाल ९७.५०% लागला असून ज्ञानदीप माध्यमिक विद्यामंदिर बोरघर १९ पैकी १८ निकाल ९४.७३%हाजीताहीरजालगांवकर उर्दू तळा हायस्कूल १५ पैकी १३ उत्तीर्ण झाले असून ८६.६६% निकाल लागला असून, संपूर्ण संचालक मंडळ यांच्या योग्य मार्गदर्शनाने निकाल९५.९४% लागला आहे.
 
यशस्वी विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,संस्था चालक याचे सर्व स्तरातून व तळा पत्रकार संघाकडून अभिनंदन केले जात असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.