कर्जत | पेण-खोपोली मार्गावर वाकरूळ हद्दीत रविवारी (१९ मे) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास भरघाव ट्रेलर आणि डंपर याच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही चालक गंभीर जखमी झाले आहेत.ट्रेलर हा खोपोलीच्या दिशेकडे
जात होता.
तर डंपर खोपोलीहून पेणकडे येत होता. पेण पूर्व विभागातील वाकरूळ गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरात होती की त्यामध्ये दोनही चालक गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थांनी,युवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.
तर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी येणारे मंगेश दळवी यांनी तातडीने घटनास्थळी पोहचत अपघातग्रस्तांना मदत करीत मावळ प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेतून अपघातग्रस्तांना पेणमधील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केले.या अपघातामुळे पेण-खोपोली मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी वाहतूक कोडी सुरळीत केली.