रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या घरात भाऊबंदकीचा वाद?

संपर्क कार्यालयावरुन उदय सामंत यांचा बॅनर आणि फोटो काढले!

By Raigad Times    02-May-2024
Total Views |
ratnagiri
 
रत्नागिरी | लोकसभा निवडणूकीपुर्वी वाद शमतोय असे दिसत असताना,रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांच्यात पुन्हा एकदा भाऊबंदकीचा वाद पहायला मिळत आहे. या दोघा भावांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.या वादामुळे कोकणातील राजकारण चांगले तापले आहे.
 
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातला भाजपाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदनारी देण्यात आली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत निवडणूक लढवणार आहेत. नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यांत धूमशान रंगणार आहे. तत्पूर्वी रत्नागिरीत सामंत विरुद्ध सामंत असा सामना सुरू झाला होता.
 
उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा होती. त्यांनी तयारीदेखील केली होती. मात्र या मतदारसंघातून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर होण्याच्या अगदी काही क्षण आधी उदय सामंत आणि किरण सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि माघार घेत असल्याची घोषणा केली.
 
यानंतर महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार करणार, असे ओशासन उदय सामंत आणि किरण सामंतांनी पत्रकार परिषदेतून दिले. किरण सामंतांचा मान राखला जाईल, असे ओशासन अमित शहांनी दिल्याची माहिती यावेळी उदय
सामंत यांनी पत्रकारांना दिली होती.
 
मात्र दोन बंधूंमधील वाद आतमध्ये धुमसत होता. या वादाला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धुमारे फुटले आहेत.किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत संपर्क कार्यालयावरील बॅनर बदलून आता ‘किरण सामंत संपर्क कार्यालय’ असे बॅनर लावले आहे. त्यामुळे किरण सामंत अद्यापही उमेदवारीवरून नाराज असल्याची चर्चा तळ कोकणात सुरू झाली आहे.
 
नव्याने लावण्यात आलेल्या बॅनरवरून उदय सामंत यांचाही फोटो हटवण्यात आला आहे.दरम्यान, नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत कोण किरण सामंत? असा उल्लेख करत सामंतांचा अपमान केला होता.त्याचवेळी नारायण राणेंचे जहाज बुडाल्याचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले होते.तीन वर्षांत कोकणात उद्योग आणणार, या राणेंच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला.