सुधागड तालुयात बिबट्याची दहशत ; वन विभागाचे खबरदारीचे आवाहन

By Raigad Times    11-May-2024
Total Views |
 pali
 
सुधागड-पाली | सुधागड तालुयातील माणगाव बुद्रुक गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. मंगळवारी (७ मे) व बुधवारी (८ मे) रात्री गावात बिबट्या शिरल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले आहे. परिणामी ग्रामस्थ भयभीत असून या बिबट्याने एका कुत्र्याची शिकारदेखील केली आहे. याआधी काही दिवसांपूर्वी तालुयातील माणगाव बुद्रुक परिसरातील पावसाळावाडी व उंबरवाडी गावातील गुरांना बिबट्याने ठार मारल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
 
या संदर्भात गुरुवारी (९ मे) वन विभागाचे वनक्षेत्रपाल विकास तरसे व कर्मचार्‍यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांना खबरदारीचे आवाहन केले आहे. वनक्षेत्रपाल विकास तरसे यांनी सांगितले की, गावात बिबट्या येते असल्याबाबत शहानिशा केली जाईल. त्यासाठी बिबट्याच्या पायांचे ठसे, त्याने केलेली शिकार आदी पुरावे शोधले जातील. मात्र तोपर्यंत गावकर्‍यांनी सतर्क रहावे. रात्रीचे घराबाहेर पडू नये. रात्री शौचास बाहेर जाऊ नये, असे तरसे म्हणाले.
 
माणगाव बुद्रुक गावाच्या आजूबाजूला डोंगर व जंगल आहे. जंगलात पाण्याची व अन्नाची कमतरता असल्याने बिबट्या भक्षाच्या व पाण्याच्या शोधात गावात येण्याची शयता आहे. गावातील भटके कुत्रे हे बिबट्याचे सोप्पे शिकार असल्याने कुत्र्यांच्या शिकारीसाठी गावात बिबट्या येऊ शकतो. मात्र यामुळे ग्रामस्थ घाबरले आहेत.
पावसाळावाडी व उंबरवाडी येथे बिबट्याने गुरांना मारले
सुधागड तालुयातील पावसाळावाडी येथील प्रवीण खेरेटकर यांच्या चरण्यासाठी गेलेल्या एका गाईला २ मे रोजी बिबट्याने ठार मारले. यासंदर्भात प्रवीण खेरेटकर यांनी पाली वनक्षेत्रपाल यांना निवेदन देऊन भरपाईची मागणी केली आहे. तर सुधागड तालुयातील उंबरवाडी येथील महिपत शिंदे यांच्या चरण्यासाठी गेलेल्या एका गाय वासराला ८ मार्च रोजी बिबट्याने ठार मारले.
 
यासंदर्भात महिपत शिंदे यांनी पाली वनक्षेत्रपाल यांना निवेदन देऊन भरपाईची मागणी केली आहे. एकूण परिस्थिती पाहता माणगाव बुद्रुक व आजूबाजूच्या गावांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे आणि बिबट्याने आत्तापर्यंत गुरे व कुत्रे ठार मारले आहे.
गावकर्‍यांना लागलीच भेटून खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्यापासून संरक्षण कसे करावे व सुरक्षित कसे रहावे, यासंदर्भात गावात पोस्टर लावण्यात येतील. गावात बिबट्या येत असल्याचे पुरावे शोधण्यासाठी ट्रॅप कॅमेरे देखील लावण्यात येतील. त्यानंतर योग्य ती उपाययोजना वन विभागातर्फे केली जाईल. - विकास तरसे, वनक्षेत्रपाल, सुधागड-पाली
मागील दोन दिवसांपासून गावात बिबट्याचा वावर असल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत आहेत. या संदर्भात वन विभागाला माहिती देण्यात आली आहे आणि त्यानुसार वन विभाग अधिकारी व कर्मचार्‍यांनी गावाला भेट दिली. यासंदर्भात योग्य ती उपायोजना करण्यात यावी. - रक्षक वाघमारे, ग्रामस्थ