खोपोली नगरपालिकेचा कर वसुलीचा विक्रम

09 Apr 2024 13:05:11
 khopoli
 
खोपोली | खोपोली नगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात पावणे सतरा कोटींची वसुली केली असून हा आजवरील सर्वांधिक वसुलीचा विक्रम आहे. मालमत्ता कर विभागाने गेले वर्षभर नियोजनबध्द पध्दतीने रूपरेषा आखली होती.
 
अनेक वर्षापासून मालमत्ता कराची थकबाकी न भरणार्‍या २४ थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी नळ कनेक्शन तोडण्यात आले, थकबाकीदारांच्या नावांचे बॅनरद्वारे जाहीर प्रसिद्धी यासारखी कारवाई करण्यात आल्याने नगरपालिकेच्या तिजोरीत ३१ मार्च अखेर पावणे सतरा कोटी रूपये जमा झाले आहेत.
Powered By Sangraha 9.0