दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून, पवारांची साथ सोडणारा मी नव्हे ! रोहित पवारांनी सुनील तटकरेंना सुनावले

By Raigad Times    09-Apr-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून पवारांची साथ सोडणारा मी नाही. मला बोलायला भाग पाडू नका. आदरणीय शरद पवार यांची साथ सोडली. त्याचप्रमाणे अजितदादांची साथ सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय? असा प्रश्न रोहित पवार यांनी रायगड लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विचारला आहे.
 
२०१९ मध्ये रोहित पवार हडपसर विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे अशा सुमार बाल बुद्धीच्या, नवख्या व्यक्तीबाबत आपल्याला फारसं बोलायचं नाही, अशी टीका तटकरे यांनी केली होती.या टीकेला उत्तर देताना, रोहित पवार यांनी तटकरे यांच्यावर ट्विटर अकाऊंटवरुन निशाणा साधला आहे.
 
‘तटकरे साहेब, तुमच्यासारखा केंद्रीय यंत्रणांना घाबरुन अटकेपासून सुटकेची भीक मागणारा आणि विचारांची गद्दारी करणारा मी नाही. भाजपमध्ये जायचे असते, तर आज केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीचा ससेमीरा चुकवण्यासाठी तुमच्याप्रमाणे भाजपची आरती गात बसलो असतो. अजूनही बोलायला भाग पाडले तर परवडणार नाही असा इशाराच तटकरेंना दिला आहे.