इंडिया आघाडीचे अनंत गीते तटकरेंचा पराभव करतील ; जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांचा विश्वास

By Raigad Times    05-Apr-2024
Total Views |
tala
 
तळा । श्रीवर्धन म्हसळा माणगांव तळा इंदापूर या ठिकाणी मतदारांचा पाठिंबा असल्याचे दिसून येत असून इंडिया आघाडीचे अनंत गीते हे सुनील तटकरेंचा पराभव करतील व विजयी होतील असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी व्यक्त केला.
 
मागील निवडणुकीत चुकीच्या माणसाला आपण निवडून दिले. ही चूक सुधारण्याची वेळ आल्याचे यावेळी सांगितले.शिवसेनेची संवाद यात्रा तळा तालुक्यातील बोरघर येथे पार पडली. या संवाद यात्रेला तळा तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील मतदारांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अनंत गीते यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची झोप उडाली असल्याचेही ते म्हणाले.यावेळी उमेदवार व प्रमुख मार्गदर्शक अनंत गीते ठाकरे, शिवसेना पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम, खेड दापोलीचे माजी आमदार संजय कदम, जिल्हा महिला संघटक, दिघे शे.का.पक्षाचे रमेश मोरे, माणगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी, म्हसळा तालुकाप्रमुख नंदु शिर्के, तांदळेकर सोनवणे तालुका महिला आघाडीच्या संघटक लता मुंढे, शे.का.पक्षाचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर भोईर, महंमद परदेशी, कानू विचारे यांच्यासह इंडिया आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
रायगड लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेनेचे अनंत गीते विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यामध्ये सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. समाजमाध्यमांवर या दोन्ही नेत्यांचे फोटो झळकत असून यांच्या मध्ये काटे की टक्कर होणार असे मेसेज व्हायरल होत आहेत.
 
आता प्रत्यक्षात निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे.अनंत गीते यांच्या संवाद दौर्‍याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तळा तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही, बोरघर येथे जनसंवाद दौरा सभा घेवून ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख नितीन साळवी पदाधिकारी यांनी नियोजन करत कमी वेळेत त्यांना यश आले.