दुचाकी अपघात, एकाचा मृत्यू

By Raigad Times    04-Apr-2024
Total Views |
 Panvel
 
नवीन पनवेल | कळंबोली सर्कल येथून पनवेल कडे जाणार्‍या रस्त्यावर मोटरसायकल डिव्हायडरला धडकल्याने यात प्रवीण तानू पळसमकर( राहणार ,कोळीवाडा घणसोली) मृत्यू झाला. या घटनेची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली.
 
दोन एप्रिल रोजी प्रवीण आणि अविनाश जोगळे हे पनवेल येथे दुचाकीवरून जात होते. ऍक्टिवा स्कुटी क्रमांक एम एच ४३ बीटी ४०६६ ही प्रवीण चालवत होता.
 
दोघेही कळंबोली सर्कल येथून पनवेल येथे जात असताना खांदा कॉलनीच्या ब्रिजवर चढताना रस्त्याच्या डिव्हायडरला गाडी धडकून ते खाली पडले. यात प्रवीण जखमी झाला. तसेच अविनाश याला देखील मार लागला. त्यांना एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे नेण्यात आले. डॉक्टरांनी प्रवीण याला मृत घोषित केले.