ट्रेलरची कारला धडक; रोह्यातील दोन तरुणांचा मृत्यू, एक जखमी

By Raigad Times    04-Apr-2024
Total Views |
Roha 
 
रोहा | मुंबई-गोवा महामार्गावर एका सेलेरीयो कारला भरधार ट्रेलरने जोरदार धडक दिली. या अपघातात रोहा येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री हा अपघात झाला.
 
रोहा वरसे येथे राहणार योगेश सुधाकर गुरव, राम मंदिर जवळ, मराठा आळी येथे राहणार परेश नामदेव खांडेकर आणि योगेश मनोहर पाटील, राहणार वैभव नगर वरसे हे तिघे सेलोरीयो कारने प्रवास करत होते.
 
मंगळवारी २ एप्रिल रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास ते कोलाड जवळील कोकण रेल्वे पुलाखालून रस्ता ओलांडत असताना, एका ट्रेलरने त्यांच्सा सेलेरीयो जोरदार धडक दिली.
 
या अपघाता योगेश गुरव आणि परेश याचा जागीच मृत्यू झाला. तर योगेश मनोहर पाटील हा गंभीर जखमी झाला आहे. अपघात करणारा ट्रेलरचालक शेरसिंग ओमप्रकाश यादव रा.चरणदिप घाट मलकापूर, संभल उत्तर प्रदेश याला कोलाड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर भादवी कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.