आगीत डंपर जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही

By Raigad Times    04-Apr-2024
Total Views |
 khopoli
खोपोली | जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गांवर सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास चौक गावच्या हॉटेल तेजस मालवणी मेजवानी जवळच एका रिकाम्या डंपरला आग लागली. डंपरची केबिन जळून खाक झाली.
 
चालक आकाश पवार (रा. ओवले) यांनी सावधानता दाखवत डंपरमधून बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली मात्र आगीत डंपर जळून खाक झाला आहे.
 
डंपरला आग लागण्याने महामार्गांवर वाहतूक दुसर्‍या बाजूने वळविण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल चौक पोलिस स्टेशनचे पोलिस, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, ग्रामस्थ मदतीसाठी घटनास्थळी हजर झाले व अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझविण्यात आली.