कर्जत तालुयात ५३ गाववाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

By Raigad Times    29-Apr-2024
Total Views |
 karjat
 
कर्जत | सध्या उन्हाळा महिना कडक सुरू झाला आहे. कर्जत तालुयातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून पाणीटंचाई निवारणासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. पाण्याची समस्या गंभीर
असलेल्या २५ गावे आणि २८ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
 
दरवर्षी पंचायत समिती उन्हाळ्यात टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी अराखडा तयार करत असते.ठराविक गावे, वाड्या पाड्याना टँकर द्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. मात्र यावेळेस गावांचा आकडा वाढला आहे.शासन दरवर्षी आपली जबाबदारी पार पाडत असते.
 
काही संस्था, संघटना,फाऊंडेशनच्या माध्यमातूनदेखील पाण्याचे टँकर पुरविले जात आहेत.महिलांना या वर्षीदेखील पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ‘असा उन्हाळा नको ग बाई’अशी बोलण्याची वेळ महिलांवर येऊन ठेपली आहे.गावांमध्ये महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
 
त्यामुळे प्रशासनाक डू न टँकरचे प्रस्ताव वाढू लागले आहेत, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच संस्था, फाऊंडेशनला भेटून त्यांच्याकडून ही पाण्याची मागणी होत आहे. त्यामुळे शासनाला कुठे तरी मदतीचा हात मिळत आहे.